Health via Organic farming

In this Article, Health via Organic farming Mr. Somanath Patanakar make us aware about today’s Lifestyle and the
dangerous price we pay due to chemically poisonous foods.

He first inform us about why we are having Lifestyle diseases and how much really we are paying for it.
Then he goes at length to educate us on Organic farming. Here Mr. Patanakar suggests that we need to produce crops
organically without the harmful Chemicals.

You will find his three-part article, Health via Organic farming very interesting and mind provoking.
Should you need an English version of the same Article, Health via Organic farming please get in touch with us.

How to get Free advice?

Mr.Somnath Patankar is a horticulturist and an agro-consultant. He writes many informative articles on Agro-Consulting, Horticulture, Role of Silica, Bio-Fertilizers, Food Grade Disinfectants etc.You can post here your question/query about organic farming or fill the contact us form to get the Free advice from Mr.Patankar.

Regards

Dhananjay Pathak

 Health via Organic farming Part 1

भाग १

शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी” संत तुकाराम महाराजांचा हा श्लोक वाचून त्यावर काल मी चिंतन करताना जे विचार सुचले ते इथे आपल्या सर्वांच्या हितार्थ मांडण्याचा प्रयत्न.

आजच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात माणूस हा यंत्रा सारखा काम करताना दिसतो व हे तो फक्त जगणे किंवा अधिक सुखमय जीवन जगणे ह्या एकाच ध्येयासाठी एवढी पळापळ करताना आपण रोज पाहतो.  मुंबईकरांचे निम्यापेक्षा अधिक आयुष्य हे ट्रेन/ रेल्वेच्या प्रवासामध्ये व्यतीत होताना दिसते. परिणामी अतिव्यस्थतेमुळे वेळेवर खाणे पिणे न होणे अपरिहार्याने आलेच.

त्यातच आजचे प्रदूषण (हवा किंवा पाणी) ह्यामुळे आरोग्याच्या समस्या (दमा, डायबेटिस, कॅन्सर, लठ्ठपणा इ) ह्या खूप कमी वयातच मानवाला जखडून ठेवताना दिसतात. म्हणजेच सर्वसाधारपणे एका कुटुंबामध्ये 4-5 लोक राहत असतील तर त्यांचा ह्या आजारपणामुळे अंदाजे प्रति मानसी कमीत कमी  ३५००  ते १०००० रुपये प्रति वर्ष एवढा खर्च येतो. म्हणजेच वार्षिक खर्च हा ५०००० रुपये आपण फक्त आरोग्यावर खर्च करतो व तेही अगदी  नकळत.

ह्याचा अर्थ आपण हे पैसे व्यर्थ घालवतोय का?  योग्य आहार / जेवत नाही का?
तर विचार करून बघुयात. सर्वश्रुत पणे आज बाजारात सर्व भाजीपाला व खाद्य हे रासायनिक विषयुक्त खताचा व कीड व रोगणशकाचा भरमसाठ वापर करून पिकवलेला खात आहोत ज्याचा परिणाम आपल्या शारीरिक रोगप्रतिकार शक्तीवर होतोय. परिणामी आपले शरीर आजारी होतेय.

बर हा भाजीपाला व खाद्य जे आज एवढ्या महाग उपलब्ध होतात कि त्यावर प्रतिकुटूंब २५००० ते ४५००० एवढा खर्च होतो. तरीही योग्य व शुद्ध, पौष्टिक अन्न आपल्याला खायला मिळते का?

म्हणजे आपण ४५००० + ५०००० (आहार+आरोग्य) एकूण मिळून अंदाजे ९० हजार एवढा करतो.

पण जर आपल्या खर्च करूनही योग्य अन्न मिळवू शकत नाही तर मग आपले शारीरिक आयुष्य दीर्घायुष्य असे बनेल. तसेच आपली पुढची पिढी  सशक्त कशी जन्माला येईल व वाढेल.

म्हणूनच वाटतेय कि काहीतरी योग्य सुरुवातीची गरज आहे. पौष्टीक रसायनमुक्त विषमुक्त अन्न खाण्याची गरज आहे. तरच वरील श्लोकाप्रमाणे आपण “शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी” ह्या उक्तीला न्यायिक भूमिका घेऊन आपले व आपल्या पुढील पिढ्यांचे आयुष्य दीर्घायुषयी बनवूयात.

कसे?

सेंद्रिय (खात्रीशीर) भाजीपाला व खाद्य अन्नाचे सेवन करूयात व आयुष्य सुदृढ व सशक्त बनऊयात.

 Health via Organic farming Part 2

 

भाग २

आजच्या आधुनिक स्पर्धात्मक धावपळीच्या युगात मानसाने स्वतः च  नवीन 5 अत्यंत आवश्यक गरजा निर्माण करून घेतल्या आहेत….

 1. अन्न
 2. वस्त्र
 3. निवारा
 4. सर्वोत्तम असणे/ दिसणे (भास तयार करणे) आणि त्यासाठी भरपूर पैसे कमावण्याची शर्यत
 5. ह्या शर्यतीच्या फलस्वरूप असाध्य रोग किंवा शारीरिक व्याधी.

सर्वच वाचक माझ्या ह्या मतांशी सहमत असतील असेही नाही आणि असावे असा माझा हट्टाही नाही…

पण  मी नेहमी असाच गावातून जात असताना एक म्हातारंबाबा पहिले मस्त 50 किलोचे वजन (कदाचित शेतातील काही माल असू शकतो) असलेली पोती त्याच्या बैलगाडीमध्ये भरत होते. त्याचवेळी त्याचा शहरातून आलेला मुलगा व नातू हेसुद्धा त्यांना  मदत करण्याचा प्रयत्न करत होते. ते बाबा इतकं वय होऊनही जबरदस्त सशक्तपने ते काम करत होते आणि जे शहरातून गावी सुट्टीसाठी आलेले हे तरुण किंवा मध्यवर्गीय नातू/मुलगा दम लागल्यामुळे त्रस्त होताना दिसत होत. मी त्या बाबांना विचारले त्याच्या सशक्तपणाबद्दल तर त्यांनी जे उत्तर दिले ते खूपच छान….

त्याच्या मते त्यांनी त्याच्या बालपणी व तरूपणपर्यंत जे अन्न खाल्लं ते सर्व पौष्टिक व पूर्ण नैसर्गिक उत्पादन होते. आज शेतकरी भरमसाठ रासायनिक खते, औषधे वापरून अधिक व पहिल्या पेक्ष्या  अधिकच पीकउत्पन्न घेण्याच्या शर्यतीत धान्य, भाजीपाला ह्यातील पौष्टिकता गमावून बसलाय. त्यामुळये आपल्याला जे अन्न म्हणून बाजारात उपलब्ध आहे हे पौष्टिकच असेल ह्याची ना त्या शेतकरी बांधवाना जाणीव असते ना आपल्याला माहिती…. परिणामी सर्व विषयुक्त अन्न आपण खूप महागशिर किमतीमध्ये विकत घेऊन खाताना ह्या व्याधहि विकत घेतोय हे पूर्णपणे विसरून जातोय किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय असा मला प्रकर्षाने जाणवतेय….

आपण आपले आयुष्य व आपली भावी पिढी सशक्त व बलवान , सर्वं रोग प्रतिकारक शक्ती असलेली बनवावी कि आज जे खातोय तेच कायमस्वरूपी चालू ठेऊन त्यांनाही रोगयुक्त, विषयुक्त जीवन वारसाहक्काने देणार आहोत…

पटलं तर विचार करा।

 

 

 Health via Organic farming Part 3

भाग ३

गेल्या 1 वर्षात एका महाराष्ट्रातील  माझ्या  मित्रपरिवार मधील 21 जन आजारपणात  वारले व काहीजण ह्या असल्या आजारांनी त्रस्त आहेत. विशेष म्हणजे ज्यांची वये माझ्या पेक्षा कमी होती. ऐन  तारुण्यात,

 • ब्रेनट्युमर..
 • कॅन्सर..
 • हार्टअॅटक..
 • किडणी फेल..
 • ब्लडप्रेशर..
 • डायबीटीस.,.

यासारखे भयंकर आजार होउन मरण्याची कारणे होती…. रोजच्या आहारात खाल्ले जाणारे, विषयुक्त अन्न आणी पाणी, रोज या स्लोपॉयजन मुळे निर्जीव झालेली सजीव शरीरे, याला कारणीभुत आहे, शेतकरी बांधवांकडून विषारी किटकनाशकांचा बेसुमार वापर, व जास्त पिकाच्या हव्यासापाेटी अज्ञानाने केलेला रासायनिक खतांचा अतीरेकी वापर.. आजच्या पैश्याच्या मागे धावणाऱ्या जगात त्याचेही मत असेच असेल ना कि, “जगाचे काहीही होवाे मला  मात्र चारपैसे जास्त मिळाले पाहीजेत.

त्याचे विचार आजच्या युगात चुकीचे ठरवण्याचा अधिकार मला नाही पण आजच त्याला सावध व त्याची मते बरोबर व योग्य दिशेस प्रवर्तित नाही केली तर हा आपल्या प्रत्येकाचा हव्यास उद्या आपल्याच मुलाबाळांच्या जिवावर उठणार आहे..

कसे ?????

हे असेच चालू राहीलेतर 2025 सालापर्यंत जन्माला येणारी 25% मुले विकलांग जन्मतील. 100 वर्षांनंतर भारतातली तरी मानवजात नक्कीच नष्ट होईल.

ह्याला फक्त एकटा शेतकरी जबाबदार नसेल कारण आपणही आजच्या प्रलोभनाच्या युगात त्या प्रलोभनाच्या तुलनेत आपल्या ह्या बहुमूल्य शरीराला नेमकी किती किंमत देतो हे आपण जाणले तर ह्याचे उत्तर आपल्याला लगेच मिळेल.

सोप्प उदाहरण देऊयात..

आपण जेव्हा एकाद्या केशकर्तनालयात केस केस कापण्यासाठी, किंवा शारीरिक सुशोभीकरणासाठी जातो तेव्हा एका दिवसात 300 रुपयांपासून ते 2500 रुपये इतक्या महाग खर्च करताना कोणतीही कचकूच त्या दुकानाच्या मालकाशी करत नाही. लगेच पैसे काढून देतो. पण आपण भाजीपाला मंडईमध्ये जातो तेव्हा मेथीची जुडी 10 रुपये असा जर तो विक्रेता बोलला तरी आपण जस हिमालय कोसाळला असे प्रतिक्रिया आपल्या चेहऱ्यावर आणतो व लगेच 5 रुपयांना 2 जुड्या दे असे न विचार करता मागतो. ज्या शेतकऱ्याला ती जोडी पिकवतलाच 7.5 रुपये लागले असतील त्याला तुम्ही जर 2 जुड्या 5 रुपयात मागाल तर तो तुम्हला गटारात किंवा गटारावर पिकवलेला भाजीपाला पुरवतो.  जो आपल्याला हानिकारक असतो.

म्हणजे आपल्याला आपल्या शारीरिक बाह्य सुंदरता हि आपल्या शारीरिक आरोग्यापेक्षा अधिक मौल्यवान व महत्वाचे असल्याचे आपल्याला आढळून येते..

मी म्हणतोय ते वाचणाराला पटलाही असेल व तो गालात हसेलहि पण ह्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा असे मला वाटते.. कारण

जर अशीच  परिस्थिती राहिली तर  ह्या वरील दुर्धर आजारानी आपल्या डोळ्यासमोर आपली माणसे  कुत्र्यामांजरा सारखी तडफडून मरताना पाहणे आपल्याला शक्य आहे का?? तर काय करणार कमावलेल्या एव्हड्या पैशाचा उपयोग काय??

सगळेच मिडीया सांगनार नाही आपणच सु​ज्ञपणे निर्णय घेऊन चांगला मार्ग अवलंबला पाहीजे.

सुशिक्षित लोक आपण जर माझ्याशी सहमत असालतर नक्की आपल्या प्रतिक्रिया व सल्लात्मक मत द्या.

☺एक छोटासा प्रयत्न आहे, जनजागृतीचा, कृपया  टिंगल टावाळी करू नका आपण काय मदत करू शकता? आपल्या प्रतीक्रीया नक्की कळवा.

प्रत्तेकाने हा विचार 10 सुशिक्षित लोकांपर्यंत पोहोचविला तर 1 दिवसांत आपण 1 लाख लोकांपर्यंत पोहोचू.

या कार्यात सहभागी असणाऱ्य सर्वांना विनम्र अभिवादन….सर्वांनी एकत्रितपणे काम केलेतर खुप मोठी क्रांती होईल यात शंका नाही…

समाजसेवेसाठी आपल्या गृपचा उपयोग होउद्या. या विषयावर मोफत प्रबोधनासाठी जरूर संपर्क करा.

पडूद्या पहिले पाऊल प्रगतीकडे…

एकमेका सहय्य करू अवघे होउ श्रीमंत धन्यवाद!!!!!!!

 

Pin It on Pinterest

Share This