Organic soil Carbon

The key to Soil Health and consistent Production.

In the following Marathi article written by Mr.Somnath Patankar, he clearly emphasizes the importance of Organic soil carbon.
He gives an example of a farmer stating that no Tomato production output is achieved in spite of the use of
fertilizers and insecticides.

When looked at the core of the problem, it is found out that very low Organic soil carbon is responsible for less or
no production. He states that ideally, Organic soil carbon should be 2% for good fertile soil, while it is only 0.5% in the desert soil.
Surprisingly average Organic soil carbon of the farm of this farmer was hardly 0.3 %. which is half of the Desert soil.

Quiet unaware of this fact, Farmers are expecting maximum production by use of fertilizers and insecticides alone, without even thinking of Organic soil carbon which is the root cause. Mr. Patanaker then guides further how to have Organic soil carbon to be increased using his innovative ways. Besides that using a soluble silicon such as Silamol also would help to boost overall growth of the plant and the crop production.

How to get free advice?

You can contact Mr.Somnath Patankar for a free primary advice by posting your name, contact details, and email.
Please also post if you would like to read its English version.

Read below …

“शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, तसेच पहेलवान भुमाते पोटी पिक भरघोस रसाळ”

 

आज काही भागान मधील शेतकरंच्या व्यथा ऐकल्या एक शेतकरी व्यथा सांगत होते, “कि दोन वर्षापासुन आमच्या भागात टोमॅटो जमतच नाहीं, व्हायरस कंट्रोल होतच नाहीं, कितिही भारी औषधे मारा काही फरकच पडत नाहीं, आपल्या भागातुन टोमॅटोचा विषय संपला”.

त्याचे हे बोलने ऐकल्या नंतर आसे कळले कि टोमॅटो रोगामुळे जात असते तर कुठल्यातरी औषधाने ठिक झालेच असते,

*मुळ समस्या पिकाची नाहीं, मातिची आहे, तिचा कस (सेंद्रिय कर्ब) कमी झाला. बरं किती कमी झाला असेल….!!*

*थोड़ी आकडेवारी पाहुया, सुपिक जमिनिचा सेंद्रिय कर्ब २% असतो,*

*तर वाळवंटात तो ०.५ % म्हनजे अर्धा टक्का असतो *

तर मग आपल्या जमिनिचा किमान यापेक्षा जास्तच असायला हवा पण दुर्दैवाने वस्तुस्थिति अत्यंत भयावह अशी आहे, कि

*बागायती जमिनिंचा सरासरी सेंद्रिय कर्ब ०.३ % !!

म्हनजे वाळवंटापेक्षा दुप्पटिने निकस जमिन,*

आणि आजचा शेतकरी पिकवण्याची कसरत करत आहे भरघोस उत्पादनाची आस लावून बसलाय

*परिणामी कमजोर मातेच्या पोटी अशक्त व अपंग बाळ जन्माला येते, त्याप्रमाने कोणतेहि पिक लावा रोग त्याच्या पाचविला पुजलेला असतो.*

रोग कमि यावे व अनुकूल वातावरण मिळावे याकरिता शेतकरी हायटेक टेक्नोलॉजी वापरतात, मल्चिंग करतात, शेडनेट, पॅलिहाउस करतात माझे ह्या हाईटेक शेतीला दुमत नाही पण होते काय ?

८०% शेतकऱ्यांचे कर्जदेखील फिटत नाहीं.

मग ओपन मधिल शेतकऱ्यांचे हाल विचारायलाच नकोत….

हि सगळी बँका जगवण्याची व शेतकरी संपवण्याचे जागतिक शोषण कारी व्यवस्थेचे षडयंत्र आहे.

एक वर्ष पिक चांगले येते, मग पुढचे काही वर्ष त्याचे झालेले पैसे पुन्हा त्यातच खर्च करायचे व पुन्हा पहिल्यासारखे उत्पन्न निघण्याची वाट पहायची, हे दुष्ट चक्र चालुच रहाते.  हेच उदाहरण घ्या….,

*सोयाबिन चे निरुपयोगी, बेभरवशाचे पिक आपण करु लागलो, चार-पाच वर्षांपर्यत केवळ पेरले कि पावसाच्या पाण्यावर काहिही न करता येत होते पण आजची परिस्थिति पहा, सोयाबिनला कोराजन मारायची वेळ आली. कुठे चाललाय शेतकऱ्यांचा खर्च…. कशी परवडनार असी शेती?*

मला असे वाटते कि,

विचार करा समस्या निट समजुन घेणे गरजेचे आहे ….

मुख्य उपाय मातीच्या व पिकाच्या पोषणावर करने गरजेचे आहे,

मग दुय्यम उपाय रोगांसाठी करायला हवे.

पण होते ते उलटेच.

*पावसाळी वातावरणात किंवा प्रतिकूल वातावरणात पिकांचे पोषण अत्यल्प होते किंवा थांबते.*

“पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते .परिणामी प्रतिकारशक्ति कमी होते, पिक पिवळी पडून विविध रोगांना बळी पडतात.

शेतकरी किडी व रोगावर नियंत्रन मिळविण्यासाठी खुप खर्च करताना दिसतात पण, ह्या समस्येची तीव्रता  न्युट्रीयंट डिफीसिएन्सी

(अन्नद्रव्यांची कमतरता) मुळे वाढत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाहीं.

किडी व रोगावर औषधे मारण्याबरोबर पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवने त्याहुन महत्त्वपूर्ण आहे . अन्यथा शेतकरी किडी व रोगावर औषधे मारत रहातो व पिक कमजोर पडत जाते.

हे आसे होते कि आपन आपला रोगतर बरा करतोच आहे पन सलाईनच बंद पडले मग पुरण पने शरीरावर अशक्त पना जानवतो एक दिवस पिक कायमचे सोडुन द्यावे लागते.

*अगदी २०-२५ वर्षांपुर्वी तर एवढे रोग नव्हते, कांदा, गहु इत्यादी पिके कोणतिही विशेष काळजी न घेता आजच्यापेक्षा छान पिकायचे… असे काय होते जमिनित , त्या वेळी जे आज नाहीं ??*

चिंतन करण्या सारखा गंभीर प्रश्न आहे.

जमिनिचा कस म्हनजे

*” सेंद्रिय कर्ब “*

होय ,या वर्षीच्या ५ मार्च ला ऑग्रोवन मधिल डॉ टेकाळे यांचा

*” सेंद्रिय कर्ब म्हनजे जमिनिचा प्राण “*

हा  व २६ जुन चा ऑग्रोवन मधिल प्रशांतजी यांचा

*” सेंद्रिय कर्ब वाढवा , शेतिला शाश्वत करा “*

हया लेखात याविषयी अधिक सखोल माहिती मांडलेली आहे.

जमिनिचा कस वाढवणे गरजेचे आहे.

*आपल्याला ठाउक आहे,  जमीनिचा कस ( सॉइल कार्बन ) वाढविण्यासाठी हिरवळिचे खते, सहजिवी आतरपिके,रक्षक सापळा पिके, काष्ठ आच्छादण, गौमुत्र,जिवामृत,घनजिवामृत आदि पर्याय उपलब्ध आहेत,*

पण वस्तुस्थिति अशी आहे, आजचा शेतकरी हायटेक झालेला आहे,

त्याला स्पर्धेत टिकायचे आहे, मग फास्ट रिजल्ट पाहिजे. मग इथेच सगळा अतिरेक सुरू होतो .

*त्याचे कारण, ज्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे ज्वलन होते, त्या तुलनेत पुनर्भरण अत्यंत अल्प प्रमाणात होते.रासायनिक खतांच्या प्रत्येक ऑप्लिकेशन सोबत सॉइल कार्बन चे ज्वलन होते . चिलेशन व न्युट्रिइन्ट अपटेक साठि जिवांनुच्या सक्रियतेसाठी तो खर्ची पडतो .*

म्हनजे आजच्या हायटेक ,सुपर फास्ट शेती मध्ये  यासोबत

*”सॉइल ओरगॅनिक कार्बन “*

च्या संतुलनासाठी हायटेक टेक्नोलॉजी वापरण्याची गरज आहे .

त्यामुळे सेंद्रिय कर्बासाठी केवळ पारंपरिक स्त्रोतांवर अवलंबुन न रहाता,

ज्याप्रमाने आज आपण रासायनिक खतांच्या मात्रा टप्प्याटप्प्याने देतो ,तशी सेंद्रिय कर्बाची मात्रा नियमित पणे पुरवनारे आधुनिक तंत्रज्ञान वापरने हि काळाची गरज बनली आहे.

 

Pin It on Pinterest

Share This